Central Railway  Pudhari
रायगड

Summer Special Trains | उन्हाळी सुट्ट्यांसाठी १ हजार ४८४ विशेष गाड्या धावणार; मध्य रेल्वेची घोषणा

Central Railway | ७४९ आरक्षित तर ७३५ अनारक्षित गाड्यांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

Extra trains for summer holidays

रोहे : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १४८४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्यांमध्ये ७४९ आरक्षित तर ७३५ अनारक्षित गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रवाशांना सुट्ट्यांमध्ये आपल्या कुटुंबीय व नातेवाईकांसोबत वेळ घालवण्यासाठी सुलभ प्रवास करता यावा, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या उन्हाळी विशेष गाड्यांमध्ये मागणीनुसार आधीपासून सुरू असलेल्या काही गाड्यांसोबतच अतिरिक्त विशेष गाड्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मुंबई/दौंड–सोलापूर, पुणे–कोल्हापूर, नाशिक रोड–बडनेरा तसेच हडपसर–हरंगुळ या मार्गांवर विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच महाराष्ट्राबाहेरील प्रवासासाठी मुंबई–बलिया, मुंबई–गोरखपूर, दौंड–कलबुरगी तसेच सोलापूर–कलबुरगी/ अनकापल्ली या मार्गांवरही विशेष गाड्या धावणार आहेत.

या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन अधिक सोयीस्करपणे करता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने प्रवासी सुविधांमध्ये वाढ केली असून नेटवर्कमध्ये विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या विशेष गाड्यांच्या वेळापत्रक व थांब्यांची सविस्तर माहिती मध्य रेल्वेकडून लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT