रायगड

T-20 World Cup | मध्य रेल्वेद्वारे T-20 विश्वचषक अंतिम सामन्यासाठी मुंबई, पुण्यातील क्रिकेट चाहत्यांसाठी विशेष गाड्या

या विशेष गाड्यांचे बुकिंग आज ०७ मार्च पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाले आहे

पुढारी वृत्तसेवा

रोहे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी (०८ मार्च २०२६) रंगणाऱ्या ऐतिहासिक T-20 विश्वचषक अंतिम सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अहमदाबाद येथे होणारा हा महामुकाबला पाहण्यासाठी जाणाऱ्या मुंबई आणि पुण्यातील चाहत्यांसाठी मध्य रेल्वेने ४ विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या विशेष गाड्यांचे वेळापत्रक आणि तपशील खालीलप्रमाणे आहेत

१. मुंबई ते अहमदाबाद (CSMT-अहमदाबाद-CSMT AC सुपरफास्ट)

  • ट्रेन क्र. ०११५३: शनिवार, ७ मार्च रोजी रात्री २२:०५ वाजता CSMT वरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:४० वाजता अहमदाबादला पोहोचेल.

  • ट्रेन क्र. ०११५४ (परतीचा प्रवास): सोमवार, ९ मार्च रोजी पहाटे ०४:०० वाजता अहमदाबादवरून सुटेल आणि दुपारी १२:५५ वाजता मुंबईला पोहोचेल.

  • थांबे: दादर, ठाणे, वसई रोड, सुरत आणि वडोदरा.

२. पुणे ते अहमदाबाद (पुणे-अहमदाबाद-पुणे सुपरफास्ट)

  • ट्रेन क्र. ०१४१७: शनिवार, ७ मार्च रोजी सायंकाळी १७:३० वाजता पुणे स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०५:३० वाजता अहमदाबादला पोहोचेल.

  • ट्रेन क्र. ०१४१८ (परतीचा प्रवास): सोमवार, ९ मार्च रोजी पहाटे ०२:०० वाजता अहमदाबादवरून सुटेल आणि दुपारी १२:१० वाजता पुण्याला पोहोचेल.

  • थांबे: लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत आणि वडोदरा.

तिकीट बुकिंग आणि सुविधा

  • कधी सुरू होणार?

    या विशेष गाड्यांचे (०११५३ आणि ०१४१७) बुकिंग आज, ०७ मार्च पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाले आहे.

  • अनारक्षित तिकीट: सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांचे तिकीट UTS प्रणालीद्वारे किंवा RailOne ॲपवरून बुक करता येईल.

  • अधिक माहितीसाठी: प्रवाशांनी वेळपत्रकाच्या अधिक तपशिलासाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT