रोहे: मध्य रेल्वेने एप्रिल ते जून २०२६ या कालावधीत ८०४८ रेक्स द्वारे २१.२१ दशलक्ष टन इतकी उल्लेखनीय मालवाहतूक नोंदवली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ७६०८ रेक्स द्वारे २०.४० दशलक्ष टन मालवाहतूक झाली होती; त्या तुलनेत टनभारामध्ये जवळपास ४% वाढ झाली आहे.
तसेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल-जून २०२६ मध्ये रेक्सच्या संख्येतही ४४० रेक्सची वाढ झाली आहे.एप्रिल ते जून २०२६ या कालावधीत मालवाहतुकीतून मिळालेले एकूण उत्पन्न २१४३.८४ कोटी रुपये इतके होते.
एप्रिल ते जून २०२६ या कालावधीत एकूण २१.२१ दशलक्ष टन मालवाहतुकीपैकी, नागपूर विभागाने १२.४७ दशलक्ष टन (५९ टक्के) मालवाहतूक केली आहे, त्यानंतर मुंबई विभागाने ५.१८ दशलक्ष टन (जवळपास २४ टक्के) मालवाहतूक केली आहे.
इतर विभागांच्या योगदानामध्ये सोलापूर विभागाचा १.८५ दशलक्ष टन (९ टक्के), भुसावळ विभागाचा १.२७ दशलक्ष टन (६ टक्के) आणि पुणे विभागाचा ०.४५ दशलक्ष टन (२ टक्के) मालवाहतुकीचा समावेश आहे.
या मधुन मिळालेल्या एकूण २१४३.८४ कोटी रुपयांच्या उत्पन्नापैकी नागपूर विभागाने सर्वाधिक योगदान दिले असून त्यांचे उत्पन्न १२८२.७३ कोटी रुपये (जवळपास ६० टक्के) आहे. त्यानंतर मुंबई विभागाचे उत्पन्न ४९१.३४ कोटी रुपये (२३ टक्के) इतके आहे.
इतर विभागांच्या उत्पन्न मध्ये भुसावळ विभाग १४८.५० कोटी रुपये (७ टक्के), सोलापूर विभाग १२८.८९ कोटी रुपये (६ टक्के) आणि पुणे विभाग ९२.३९ कोटी रुपये (४ टक्के) इतका आहे. जून २०२६ मध्ये मालवाहतुकीचे प्रमाण २,६५९ रेक्सद्वारे ७.०२ दशलक्ष टन इतके होते. याउलट गेल्या वर्षी याच महिन्यात २,५६१ रेक्सद्वारे ६.८४ दशलक्ष टन मालवाहतूक झाली होती.