मध्य रेल्वेने तिकीट तपासनी कामगिरीत गाठला उच्चांक Pudhari Photo
रायगड

Central Railway | मध्य रेल्वेने तिकीट तपासनी कामगिरीत गाठला उच्चांक

पुढारी वृत्तसेवा

रोहे : मध्य रेल्वेने सणासुदीच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी विशेष उपाययोजना राबवून विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये लक्षणीय यश मिळवले आहे. मध्य रेल्वेची महसूल आणि कामगिरी (एप्रिल 2024 - सप्टेंबर 2024) पहाता मध्य रेल्वेने विनातिकीट-अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाच्या 19.09 लाख प्रकरणांमधून एकूण 111.62 कोटी रुपयांचा महसूल मिळवला.

सणासुदीच्या हंगामासाठी विशेष तिकीट तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वे, रेल्वे बोर्डाच्या निर्देशांच्या अनुषंगाने, आरक्षित डब्यांमधील अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी सर्वाधिक प्रवासाच्या कालावधीत विशेष तिकीट तपासणी ड्राइव्ह आयोजित करण्यात आले आहे. तिकीट तपासणी मोहिमेच्या तारखांमध्ये 1 ऑक्टोबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2024, 25 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 या सणासुदीच्या गर्दीत सुव्यवस्था राखणे आणि आरक्षित डब्यांमध्ये विनातिकीट किंवा अनधिकृत प्रवासाला प्रतिबंध करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दी रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि उन्हाळा आणि सणासुदीच्या काळात आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी, वाणिज्य विभागाने उपक्रम राबवला असून यामध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिम 14 जून 2024 पासून चालू केली आहे. मध्य रेल्वेने गर्दीच्या समस्यांना तोंड देत असलेल्या गाड्या निवडल्या आणि या मार्गांवर समर्पित तिकीट तपासणी पथके तैनात केली. या टीम्स विनितिकीट आणि अनारक्षित प्रवाशांना आरक्षित डब्यांमध्ये चढण्यापासून रोखत आहेत आणि त्याऐवजी त्यांना सामान्य डब्यांकडे जाण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. हे प्रवासी व्यवस्थापन 14 जून 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत करण्यात आले आहे. या कालावधीत 2 लाख 54 हजार 795 अनारक्षित प्रवाशांना 12 हजार 930 गाड्यांमधून उतरवण्यात आले किंवा त्यांना चढण्यापासून रोखण्यात आले. ज्यामुळे आरक्षित तिकिटांसह प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी आरामदायी आणि त्रासमुक्त प्रवास सुनिश्चित करण्यात आला.

मध्य रेल्वे कठोर तिकीट तपासणी, विशेष मोहिमेद्वारे कार्यक्षम सेवा आणि प्रवाशांची सोय राखण्यासाठी वचनबद्ध आहे. अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी, सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि सर्व प्रवाशांना प्रवासाचा आनंददायक अनुभव देण्यासाठी हे प्रयत्न सणासुदीच्या काळात सुरू मध्य रेल्वेकडून सुरु होणार आहे.

शिघ्र कृतीदल तैनात

शिघ्र कृतीदल तैनात करण्यात आले आहे. जास्त प्रवासी संख्येच्या अपेक्षेने, गर्दीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी आणि सुरळीत बोर्डिंग सुनिश्चित करण्यासाठी क्विक रिस्पॉन्स टीम्स महत्त्वाच्या स्थानकांवर तैनात करण्यात आल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT