रोहे (रायगड) - मध्य रेल्वे ख्रिसमस आणि हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई - करमाळी/कोचुवेली आणि पुणे - करमाळी दरम्यान ४८ विशेष गाड्या चालवणार आहे. विशेष चालवण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - करमाळी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैंनदिन विशेष - ३४ सेवा. गाडी क्रमांक 01151 विशेष दि. २०.१२.२०२४ ते दि. ०५.०१.२०२५ पर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज ००.२० वाजता सुटेल आणि करमाळी येथे त्याच दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. (१७ सेवा), गाडी क्रमांक 01152 विशेष दि. २०.१२.२०२४ ते दि. ०५.०१.२०२५ पर्यंत करमाळी येथून दररोज १४.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. (१७ सेवा)
या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवि हे थांबे देण्यात आले आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस - कोचुवेली - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष - ८ सेवा. गाडी क्रमांक 01463 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १९.१२.२०२४ ते दि. ०९.०१.२०२५ पर्यंत दर गुरुवारी १६.०० वाजता सुटेल आणि कोचुवेली येथे दुसऱ्या दिवशी २२.४५ वाजता पोहोचेल. (४ सेवा), गाडी क्रमांक 01464 विशेष दि. २१.१२.२०२४ ते दि. ११.०१.२०२५ पर्यंत दर शनिवारी कोचुवेली येथून १६.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ००.४५ वाजता पोहोचेल. (४ सेवा).
या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मूकनबिका रोड, बाय कुंदापुरा, उडुपी, सुरतकल, ठोकूर, मंगळुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर, थ्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिकारा, कायनकुलम आणि कोल्लम हे थांबे देण्यात आले आहेत.
गाडी क्रमांक 01407 विशेष गाडी दि. २५.१२.२०४ ते दि. ०८.०१.२०२५ पर्यंत दर बुधवारी ०५.१० वाजता पुणे येथून सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी २०.२५ वाजता पोहोचेल. (३ सेवा). गाडी क्रमांक 01408 विशेष गाडी दि. २५.१२.२०२४ ते दि. ०८.०१.२०२५ पर्यंत दर बुधवारी करमाळी येथून २२.२० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता पोहोचेल. (३ सेवा). या गाडीला चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि हे थांबे देण्यात आले आहेत.
विशेष ट्रेन क्र.01151/01152, 01463 आणि 01407/01408 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. १४.१२.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाऊनलोड करा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.