summer special trains pudhari photo
रायगड

Central Railway summer special trains |कोकणवासीयांना दिलासा : लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान 2 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या धावणार

उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने या निर्णयामुळे कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे

पुढारी वृत्तसेवा

LTT to Madgaon special train

रोहे : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव रेल्वे स्थानक दरम्यान दोन अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने या निर्णयामुळे कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक 01003 ही विशेष गाडी ४ मे २०२६ (सोमवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ८.२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01004 ही गाडी ३ मे २०२६ (रविवार) रोजी मडगाव येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.

या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

गाडी क्रमांक 01003 साठी आरक्षण २ मे २०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी तिकिटे UTS प्रणालीद्वारे मिळतील. तसेच प्रवासी RailOne अ‍ॅपचा वापर करूनही तिकिट बुकिंग करू शकतात.

गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी NTES अ‍ॅप किंवा संबंधित अधिकृत www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT