Central Railway Revenue Pudhari
रायगड

Central Railway Revenue: मध्य रेल्वेची वर्षभरात 79.34 दशलक्ष टन मालवाहतूक

आठ हजार 279 कोटी रुपयांचा मालवाहतूक महसूल प्राप्त; नागपूरचा महत्त्वपूर्ण वाटा

पुढारी वृत्तसेवा

रोहे: मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान 79.34 दशलक्ष टन इतकी उल्लेखनीय मालवाहतूक नोंदवली असून यामधून 8 हजार 279 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.मध्य रेल्वेच्या पाचही विभागांपैकी नागपूर विभागाने सर्वाधिक 54 टक्के योगदान देत 42.72 दशलक्ष टन लोडिंग आणि 4 हजार 597 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून हे एकूण उत्पन्नाच्या 55 टक्के आहे.

मालवाहतूक पाहता कोळसा लोडिंग 33.92 दशलक्ष टन इतके असून एकूण लोडिंगमध्ये 45 टक्के वाटा आहे. यामधून 3 हजार 219 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून ते एकूण उत्पन्नाच्या 39 टक्के आहे.

मध्य रेल्वेने लोखंडखनिज, फ्लाय ॲश आणि पेट्रोलियम उत्पादनांमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. यामध्ये लोखंडखनिज 1022 रेक (मागील वर्षी 369 रेक) 177 टक्के वाढ, फ्लाय ॲश 43 रेक (मागील वर्षी 24 रेक) 79% वाढ, पेट्रोलियम उत्पादने 2672 रेक (मागील वर्षी 2357 रेक) 13.4 टक्के वाढ झाली आहे.

इतर वस्तूंमध्ये कंटेनर : 9 हजार 522 रेक (मागील वर्षी 8960 रेक) 6.3 टक्के वाढ, सिमेंट (क्लिंकरसह) 2424 रेक (मागील वर्षी 2350 रेक) 3.1 टक्के वाढ, (क्लिंकरमध्ये मोठी झेप 635 रेकच्या तुलनेत 355 रेक 79 टक्के वाढ),अन्नधान्य : 420 रेक (मागील वर्षी 357 रेक) 17.6 टक्के वाढ, कांदा 212 रेक (मागील वर्षी 91 रेक) 133 टक्के वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेने विविध वाणिज्यिक उपक्रमांद्वारे मालवाहतूक वाढ कायम ठेवली असून खालील नवीन सायडिंग्स व कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामध्ये मोसा येथे न्यू फ्युएलको मार्च 2026 पर्यंत 35 रेक, मकरधोकरा येथे दिनेश 504 रेक, मुंगोली-निरगुडा येथे 54 रेक, लोणावळा येथे एमिरेट्स टर्मिनल्स प्रा. लि. (फेब्रुवारी 2026), बल्लारशाह येथे नवीन माल टर्मिनल (31 जानेवारी 2026) स्टील व लोखंडखनिज वाहतूक फेब्रुवारी 2026 पर्यंत 60 रेक वाहतूक झाले आहे.

मध्य रेल्वेने दीर्घ पल्ल्याच्या मालगाड्यांमध्ये 100 टक्के पेक्षा अधिक वाढ करत आर्थिक वर्ष 2024-25 मधील 312 गाड्यांवरून आर्थिक वर्ष 2025- 26 मध्ये 719 गाड्यांपर्यंत वाढ केली आहे. दररोज सरासरी 359 मालगाड्यांची देवाणघेवाण झाली आहे. मालवाहतुकीचे सामाजिक व आर्थिक महत्त्व निर्माण होत असून मध्य रेल्वेच्या कार्यक्षम सेवेमुळे कांद्याचे वेळेवर वाहतूक होऊन साठवण नुकसान कमी होते व बाजारभाव स्थिर राहतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT