छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–मडगांव दरम्यान धावणार विशेष गाड्या File Photo
रायगड

Raigad News : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–मडगांव दरम्यान धावणार विशेष गाड्या

मध्य रेल्वेकडून एकूण ८ अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

रोहे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगांव दरम्यान विशेष गाड्यासह एकुण ८ अतिरिक्त विशेष गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

या विशेष गाडयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मडगांव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (४ फेऱ्या) ट्रेन क्रमांक 01129 ही विशेष गाडी दिनांक ०३.०४.२०२६ ते ०५.०४.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता निघेल आणि मडगांव येथे त्याच दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल. (०२ फेऱ्या) ट्रेन क्रमांक 01130 ही विशेष गाडी दिनांक ०३.०४.२०२६ आणि ०५.०४.२०२६ रोजी मडगांव येथून १६.०० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. (०२ फेऱ्या) या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी हे थांबे देण्यात आले आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस नागपूर लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (२ फेऱ्या) ट्रेन क्रमांक 01021 ही विशेष गाडी दिनांक ०३.०४.२०२६ (शुक्रवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.५५ वाजता निघेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल. (०१ फेरी), ट्रेन क्रमांक 01022 ही विशेष गाडी दिनांक ०३.०४.२०२६ (शुक्रवार) रोजी नागपूर येथून २०.०० वाजता निघेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल. (०१ फेरी) या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी (ट्रेन क्रमांक 01022 साठी), नाशिक रोड, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे देण्यात आले आहेत.

पुणे-नागपूर- पुणे विशेष गाड्या (२ फेऱ्या)

ट्रेन क्रमांक 01467 ही विशेष गाडी दिनांक ०३.०४.२०२६ (शुक्रवार) रोजी पुणे येथून १५.५० वाजता निघेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. (०१ फेरी),ट्रेन क्रमांक 01468 ही विशेष गाडी दिनांक ०४.०४.२०२६ (शनिवार) रोजी नागपूर येथून ०८.०० वाजता निघेल आणि पुणे येथे त्याच दिवशी २३.३० वाजता पोहोचेल. (०१ फेरी) या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे देण्यात आले आहेत.

विशेष रेल्वे गाड्या क्रमांक 01021/22, 01467/68 आणि 01129 साठीचे आरक्षण दिनांक २४.०३.२०२६ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर खुले होईल. सामान्य दरांवरील अनारक्षित डब्यांसाठीचे आरक्षण UTS प्रणालीद्वारे करता येते. तिकिटांच्या आरक्षणासाठी प्रवासी 'RailOne' ॲप देखील डाउनलोड करू शकतात. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT