मध्य रेल्वेतर्फे अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या, मुंबई आणि मडगाव दरम्यान २ सेवा आणि मुंबई ते सोलापूर १ एकेरी विशेष गाडी pudhari photo
रायगड

Central Railway | मध्य रेल्वेतर्फे उन्हाळी विशेष गाड्या, मुंबई आणि मडगाव दरम्यान २ सेवा आणि मुंबई ते सोलापूर १ एकेरी विशेष गाडी

प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्यांचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

रोहे : मध्य रेल्वे उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर १ एकेरी विशेष गाडी चालवणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष- (२ सेवा) गाडी क्रमांक 01173 विशेष गाडी दिनांक ३०.०५.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल. (१ सेवा) गाडी क्रमांक 01174 विशेष दिनांक ३०.०५.२०२६ रोजी मडगाव येथून १६.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. (१ सेवा)

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी हे थांबे देण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सोलापूर एकेरी विशेष (१ सेवा) गाडी क्रमांक 01175 एकेरी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक ३१.०५.२०२६ रोजी दुपारी १४.३० वाजता सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी रात्री २३.४५ वाजता पोहोचेल. या गाडील दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी हे थांबे देण्यात आले आहेत.

विशेष गाडी क्रमांक: 01173 आणि 01175 साठी आरक्षण दिनांक २९.०५.२०२६ रोजी सुरू होईल सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर.

सर्वसाधारण शुल्कासह अनारक्षित डब्यांसाठी आरक्षण यूटीएस (UTS) प्रणालीद्वारे करता येईल. प्रवासी तिकीट बुकिंगसाठी रेलवन ॲप देखील डाउनलोड करू शकतात.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी, www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT