रोह : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल ते जुलै 2025) दरम्यान 7.43 दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली असून, ती आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये याच कालावधीत नोंदवलेल्या 7.32 दशलक्ष टनांच्या तुलनेत 1.5% वाढ दर्शवते. हा मागील 15 वर्षांतील या कालावधीमध्ये झालेला सर्वाधिक माललोडिंगचा आकडा आहे.
जुलै 2025 महिन्यात 2.04 दशलक्ष टन मालवाहतुकीची नोंद झाली असून, ती गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यातील 1.88 दशलक्ष टनांच्या तुलनेत 8.5% इतकी मोठी वाढ दर्शवते. हा जुलै महिन्यातील मागील 15 वर्षांतील सर्वाधिक माललोडिंगचा आकडा आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात कोणत्याही एका महिन्यात प्रथमच मालवाहतूक 2.00 दशलक्ष टनांचा टप्पा ओलांडला आहे.
जुलै 2025 मध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथून एकूण 647 रेक्स लोड करण्यात आले असून, हा आतापर्यंतचा सर्वाधिक कंटेनर लोडिंगचा विक्रम आहे.या आधीचा सर्वोत्तम आकडा जानेवारी 2025 मध्ये 641 रेक्स लोडिंगचा होता.मुंबई विभागामध्ये एकूण 769 कंटेनर रेक्स लोड करण्यात आले असून, त्यामध्ये 647 बंदरावरील कंटेनर आणि 122 देशांतर्गत कंटेनरचा समावेश आहे. हा आतापर्यंतचा सर्वोत्तम लोडिंगचा विक्रम आहे.
याआधीचा सर्वोत्तम आकडा जानेवारी 2025 मध्ये नोंदवलेला होता, जेव्हा एकूण 754 रेक्स लोड करण्यात आले होते, ज्यामध्ये 637 बंदरावरील कंटेनर आणि 117 देशांतर्गत कंटेनर होते.जुलै 2025 मध्ये दररोज सरासरी 1048 कंटेनर वॅगन लोड करण्यात आले असून, हा आतापर्यंतच्या कोणत्याही महिन्यातील सर्वाधिक लोडिंगचा विक्रम आहे. या आधीची सर्वोत्तम नोंद जानेवारी 2025 मध्ये नोंदवलेली होता, जेव्हा दररोज सरासरी 1029 कंटेनर वॅगन लोड करण्यात आले होते.
28 जुलै रोजी मुंबई विभागात एकाच दिवशी एकूण 1285 कंटेनर वॅगन 30 कंटेनर रेक्ससह लोड करण्यात आले, तर याआधीचा सर्वोत्तम आकडा दि. 23.11.2024 रोजी नोंदवला गेला होता, जेव्हा 1259 कंटेनर वॅगन लोड करण्यात आले होते. मुंबई विभागाने जुलै-2025 मध्ये वॅगन्स लोडिंगबाबतही विक्रमी आकडे नोंदवत दुसर्या क्रमांकाची सर्वोच्च लोडिंग नोंदवली आहे:
वॅगन लोडिंग मध्ये जुलै-2025 मध्ये दररोज सरासरी 1614 वॅगन्स लोड करण्यात आले, जो मुंबई विभागासाठी दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक दर आहे. जुलै-2024 मधील 1406 वॅगन्सच्या तुलनेत हे 15% अधिक आहे.कोळसा लोडिंग मध्ये कोळसा लोडिंगच्या आकड्यांमध्येही उल्लेखनीय वाढ दिसून आली असून, जुलै 2025 मध्ये 68 कोळसा रेक्स लोड करण्यात आले, तर जुलै 2024 मध्ये 48 रेक्स लोड झाले होते, यामध्ये 41% हून अधिक वाढ नोंदवली गेली आहे.
खते लोडिंग मध्ये जुलै 2025 मध्ये कलंबोली माल शेडमधून 32 खत रेक्स लोड करण्यात आले असून, हा एका महिन्यात कलंबोली माल शेडमधून करण्यात आलेला सर्वाधिक खत रेक्स लोडिंगचा विक्रम आहे. जुलै 2025 अखेरपर्यंत कलंबोली माल शेडमधून एकूण 288 खत रेक्स लोड करण्यात आले आहेत.रेक्स लोडिंग व अनलोडिंग मध्ये जुलै 2025 मध्ये एकूण 1145 रेक्स लोड करण्यात आले, तर जुलै 2024 मध्ये हेच प्रमाण 1018 रेक्स होते, यामध्ये 12% हून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. जुलै 2025 मध्ये 1104 रेक्स अनलोड करण्यात आले, तर जुलै 2024 मध्ये 905 रेक्स, यानुसार 21% हून अधिक वाढ नोंदली गेली आहे.
मालगाड्यांची देवाणघेवाणीतही आघाडी
मालगाड्यांची देवाणघेवाण मध्ये मुंबई विभागात जुलै 2025 मध्ये दररोज सरासरी 110.6 मालगाड्यांची देवाणघेवाण करण्यात आली, तर जुलै 2024 मध्ये हेच प्रमाण 101.6 मालगाड्या प्रति दिवस होते.वसई रोड (पश्चिम रेल्वे) सोबतची जुलै 2025 मधील 57.2 मालगाड्यांची देवाणघेवाण ही आतापर्यंतची सर्वोत्तम नोंद ठरली आहे,जी याआधी जून 2025 मध्ये 56.8 मालगाड्यांपर्यंत होती.