Central Railway news Pudhari
रायगड

Central Railway news: उरण मार्गावर मध्य रेल्वेच्या 10 नवीन उपनगरीय सेवांमुळे प्रवाशांना दिलासा; वर्षभरात प्रवाशांमध्ये वाढ

सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावरील 14 सेवांचे वातानुकूलित लोकल सेवांमध्ये रूपांतर

पुढारी वृत्तसेवा

रोहे: मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान, कोणत्याही गंभीर स्वरूपाच्या अपघाताविना सुमारे 8.33 लाख रेल्वे सेवा चालवल्या आहेत. यामध्ये 6.28 लाख उपनगरीय रेल्वे सेवा आणि 2.05 लाख मेल एक्स्प्रेस व प्रवासी रेल्वे सेवांचा समावेश आहे. मध्य रेल्वेने उरण मार्गावर 10 नवीन उपनगरीय सेवा सुरू केल्या आहेत; तर सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावरील 14 सेवांचे वातानुकूलित लोकल सेवांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान, प्रवासी वाहतुकीमध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे. उपनगरीय आणि उपनगरीयेतर अशा दोन्ही विभागांमध्ये सातत्यपूर्ण वाढ नोंदवली आहे. याव्यतिरिक्त, मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवीन गाड्या सुरू केल्या आहेत; तसेच सणासुदीच्या काळात विशेष गाड्या चालवल्या असून, नवीन स्थानके व अतिरिक्त थांबेही सुरू केले आहेत.

मध्य रेल्वेत आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान 8.16 लाख गाड्यांमधून एकूण 164.30 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही संख्या गेल्या वर्षी वाहतूक केलेल्या 161.33 कोटी प्रवाशांच्या तुलनेत 1.84 टक्क्यांची वाढ दर्शवते.

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 6.11 लाख उपनगरीय रेल्वे सेवांमधून 143.58 कोटी प्रवाशांची वाहतूक करण्यात आली; ही संख्या गेल्या वर्षीच्या 141.98 कोटी प्रवाशांच्या तुलनेत 1.12 टक्क्यांची वाढ दर्शवते.

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 2.05 लाख मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि इतर उपनगरीयेतर गाड्यांमधून 20.71 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे; ही संख्या गेल्या वर्षीच्या 19.34 कोटी प्रवाशांच्या तुलनेत 7.08 टक्क्यांची वाढ दर्शवते. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेवरील 33 गाड्यांना 76 अतिरिक्त थांबे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान विविध मार्गांवर 7 नवीन गाड्या सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये पुणे - अजनी - पुणे वंदे भारत एक्सप्रेस 11 ऑगस्टपासून ज्यामुळे मध्य रेल्वेवरील एकूण वंदे भारत गाड्यांची संख्या 11 झाली आहे. अमृत भारत गाड्या, त्या म्हणजे : लोकमान्य टिळक टर्मिनस- सहरसा- लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस 2 मेपासून आणि ट्रेन पनवेल- अलीपूरद्वार - पनवेल अमृत भारत एक्सप्रेस 23 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे.

याव्यतिरिक्त, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये हडपसर- जोधपूर- हडपसर एक्सप्रेस, हडपसर- रिवा- हडपसर एक्सप्रेस, हडपसर- मुजफ्फरपूर- हडपसर एक्सप्रेस आणि साईनगर शिर्डी - तिरुपती- साईनगर शिर्डी एक्सप्रेस या गाड्या देखील सुरू करण्यात आल्या.मध्य रेल्वेने उरण मार्गावर 10 नवीन उपनगरीय सेवा सुरू केल्या आहेत; यामुळे या विभागातील एकूण सेवांची संख्या 50 झाली असून, मध्य रेल्वेवरील एकूण उपनगरीय सेवांची संख्या 1820 वर पोहोचली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण मुख्य मार्गावरील 14 सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल हार्बर मार्गावरील 14 सेवांचे बिगर वातानुकूलित वरून वातानुकूलित लोकल सेवांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने यआरसीटीसीच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाच्या भारत गौरव तीर्थ यात्रा प्रकल्पाचा एक भाग म्हणून 18 भारत गौरव ट्रेन्स आणि 7 मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना गाड्यांसह 18 पर्यटक गाड्या चालवल्या.

मध्य रेल्वेवर 7 नवीन स्थानके सुरू करण्यात आली आहेत: मुंबईच्या उपनगरीय विभागात 2 स्थानके गव्हाण आणि तारघर; आणि अमळनेर-बीड मार्गावर 5 स्थानके जाटनांदूर, विघनवाडी, रायमोहा, राजुरी आणि बीड.

आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान, 12 स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असून, 77 जोड्यांच्या रेल्वेगाड्यांचा वेग 110 किमी प्रति तास वरून 130 किमी प्रति तास पर्यंत वाढवण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने, आपल्या नियमित वेळापत्रकानुसार धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त, सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एकूण 12,032 विशेष सेवा चालवल्या. यामध्ये कोकणाकडे जाणाऱ्या 326 गणपती विशेष गाड्या, 1,712 दुर्गा पूजा, दिवाळी, छठ पूजा विशेष गाड्या, 1,358 उन्हाळी विशेष गाड्या, 1,038 होळी विशेष गाड्या, 122 आषाढी एकादशी विशेष गाड्या आणि 109 हिवाळी विशेष गाड्या. याव्यतिरिक्त, एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी हाताळण्यासाठी, मध्य रेल्वेच्या 23 गाड्यांना अतिरिक्त सामान्य द्वितीय श्रेणी डब्बे जोडण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT