रोहे : मध्य रेल्वेने आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी विविध ठिकाणांसाठी १६२ अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या उत्सव विशेष गाड्यांची एकूण संख्या ५८० झाली आहे.
मध्य रेल्वेच्यावतीने पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त विशेष १६२ गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस समस्तीपुर लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाड्या (१२ सेवा). गाडी क्रमांक ०१ ०४३ साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी १३ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि समस्तीपुर येथे दुसऱ्या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल (६ सेवा). गाडी क्रमांक ०१०४४ साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी समस्तीपुर येथून ३ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल (६ सेवा).
लोकमान्य टिळक टर्मिनस दानापुर लोकमान्य टिळक टर्मिनस दैनंदिन विशेष गाड्या (८८ सेवा). गाडी क्रमांक ०११४३ दैनंदिन विशेष गाडी ९ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत दररोज लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १०.३० वाजता सुटेल आणि दानापुर येथे दुसऱ्या दिवशी २१.५० वाजता पोहोचेल (४४ सेवा). गाडी क्रमांक ०११४४ दैनंदिन विशेष गाडी १० ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दानापूर येथून ००.१० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०६.५० वाजता पोहोचेल (४४ सेवा).
लोकमान्य टिळक टर्मिनस संतरागाछी लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाड्या (८ सेवा). गाडी क्रमांक ०११०७ साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी ६ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २०.२० वाजता सुटेल आणि संतरागाछी येथे तिसऱ्या दिवशी ५ वाजता पोहोचेल (४ सेवा).गाडी क्रमांक ०११०८ साप्ताहिक एसी विशेष गाडी ८ अक्टों. ते २९ ऑक्टोबर या कालावधीत दर गुरुवारी संतरागाछी येथून ११ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता पोहोचेल (४ सेवा).
खडकी सांगानेर खडकी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी (१२सेवा). गाडी क्रमांक ०१४११ ही साप्ताहिक विशेष गाडी १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी खडकी येथून ९.४५ वाजता सुटेल आणि सांगानेर येथे दुसऱ्या दिवशी ६.४५ वाजता पोहोचेल (६सेवा).
गाडी क्रमांक ०१४१२ ही साप्ताहिक विशेष गाडी १६ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी सांगानेर येथून ११.३५ वाजता सुटेल आणि खडकी येथे दुसऱ्या दिवशी ९.३० वाजता पोहोचेल. (६ सेवा).
गाडी क्रमांक ०१०४३, गाडी क्रमांक ०११४३, गाडी क्रमांक ०११०७, गाडी क्रमांक ०५१६८, गाडी क्रमांक ०१४८३ आणि गाडी क्रमांक ०१४११ या विशेष गाड्यांचे आरक्षण २ ऑक्टोबर २०२६ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. अनारक्षित डब्यांचे तिकीट बुकिंग सामान्य दरांसह युटीएस प्रणालीद्वारे करता येईल.