Mumbai Pune old highway |
खोपोली : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बोर घाटात भीषण अपघात घडला. पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकने अचानक अर्जंट ब्रेक लावल्याने ट्रकमधील लोखंडी पाईप मागे सरकले आणि मागून येणाऱ्या एक्टिवा दुचाकी आणि कारवर कोसळले. या घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये एक्टिवा दुचाकीवर मागे बसलेली महिला आणि कारमधील ड्रायव्हरच्या शेजारी बसलेली महिला यांचा समावेश आहे. तर एक्टिवा चालक, कार चालक, कारमधील मागील महिला आणि एक लहान मुलगा जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर खोपोली शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असून त्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अपघातानंतर मदत कार्यात महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोर घाट, IRB पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, म.सु.ब.चे जवान, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, मृत्युंजय देवदूत आणि घाटातील मेकॅनिक यांनी तात्काळ सहभाग घेतल्यामुळे आणखी मोठी हानी टळली.