एसटी महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आ. भरत गोगावले File Photo
रायगड

Bharat Gogawale | एसटी आगारांची दुरवस्था सुधारण्याचा प्रयत्न करणार

पुढारी वृत्तसेवा
रायगड ः जयंत धुळप

मी लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. हातात आता दिवस खूप कमी आहेत. तरीही उपलब्ध कालखंडात राज्यातील जनसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी ज्या एसटी आगारांची दुरवस्था झाली आहे, ती सुधारण्याकरिता प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही एसटी महामंडळाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष आमदार भरतशेठ गोगावले यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी नियूक्ती झाल्यावर ते या पदाचा पदभार स्विकारणार की नाही, त्याच बरोबर हे अध्यक्षपद राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडेच असते परिणामी ते आमदार गोगावले यांना स्विकारता येणार नाही. त्याच बरोबर स्वतः आमदार गोगावले हे स्वतः नाराज आहेत, अशा चर्चांना मोठे उधाण आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर झालेली चर्चा आणि 20 सप्टेंबर रोजी राज्यपालांच्या आदेशानुसार आमदार गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियूक्ती व या पदाला मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार गोगावले यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणारे अलिबाग, कोकणातील प्रवाशांच्या दृष्टीने मध्यवर्ती महाड, कोकणचे प्रवेशद्वार असणारे पनवेल व गणेशनगरी पेण येथील एसटी आगारांची दुरावस्था दुरकरणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक कार्यवाही येत्या काही दिवसांत पूर्ण करण्याचा मनोदय आमदार गोगावले यांनी एक प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT