भरत गोगावले pudhari photo
रायगड

Raigad News | त्या मनातल्या तर मग आम्ही काय ध्यानातले : भरत गोगावले

रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा उफाळला

पुढारी वृत्तसेवा
महाड ः श्रीकृष्ण बाळ

...त्या मनातल्या तर आम्ही काय ध्यानातले आहोत, असा सवाल करत राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खात्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी 75 टक्के जनतेच्या मनातील रायगडचा पालकमंत्री भरतशेठ गोगावले असल्याचा दावा केला आहे. यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी रोहा येथील कार्यक्रमात मंत्री आदिती तटकरे यांचा नामोल्लेख करताना जनतेच्या मनातील रायगडच्या पालकमंत्री असा उल्लेख केला होता. तर आदिती तटकरेेंनी मित्रपक्ष पालकमंत्री पदावर राजकारण करत विकास खुंटल्याचे सांगितले होते. यावरून भरत गोगावलेेंनी पुन्हा एकदा या विषयावर भाष्य केले.

मंत्री अदिती तटकरे यांच्या, पालकमंत्रीपद नियुक्ती न झाल्याने रायगडचा विकास खोळंबला असून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केली असल्याच्या विधानाचा देखील मंत्री गोगावले यांनी समाचार घेतला. महायुती सरकारच्या काळात दोन ते अडीच वर्षात रेकॉर्डब्रेक विकास झाला आहे आणि ते कोणीही नाकारू शकत नाही. रायगड जिल्ह्याचा विकास पालकमंत्री पदामुळे अडलेला नाही. मात्र वरिष्ठांनी याबाबत निर्णय घ्यावा, अशी आमचीही आग्रही मागणी आहे.

पालकमंत्री पदाबाबत आम्ही देखील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली असून, ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे देखील मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले.

यामुळे एकंदरीत रायगड जिल्हा पालकमंत्री पदावरून तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष यामुळे अधिक तीव्र होताना दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी याबाबत तोडगा न निघाल्यास महायुतीला या निवडणुकांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. खा. सुनील तटकरे यांनी रायगड दौर्‍यात महायुती म्हणूनच निवडण्ाुका लढवणार असे जाहीर केलेे आहे. पण शिवसेनेने आपले पत्ते खोललेले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT