आ. भरत गोगावलेंच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा महाडमध्ये निषेध File Photo
रायगड

Bharat Gogawale | भरत गोगावलेंच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा महाडमध्ये निषेध

गुन्हा दाखल करण्याची स्नेहल जगताप यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

महाड पुढारी वृत्तसेवा : महाडचे आमदार व एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी काकर तळे येथे झालेल्या कार्यक्रमात भाषणातून नाव न घेता स्नेहल जगताप यांच्यावर केलेल्या टीकेने राजकीय वातावरण गरम झाले आहे. ना. गोगावले यांच्या वक्तव्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुन्हा दाखल करावा अन्यथा वक्तव्याबाबत आपली प्रतिक्रिया द्यावी अशी मागणी केली.

आमदार गोगावले यांच्या या महिलांविषयी काढलेल्या उद्गाराचा स्नेहल माणिक जगताप यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून हा तमाम महिला वर्गाचा अपमान असल्याचे मत व्यक्त केले आहे. काकरतळे मैदानावर झालेल्या महिलांच्या शासनाच्या महिलांविषयी असलेल्या विविध योजनांचा आढावा घेत असताना नाव न घेता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेखाली तीव्र संताप व्यक्त केला. शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी आमदार गोगावले यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या विरोधात शासनाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गावठी भाषेत बोललो 

गावठी भाषेत बोललो एवढं कोणाला लागण्याची गरज नसल्याचा खुलासा आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. जे कोणी आमच्या विरोधात वक्तव्य करीत आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही बोललो अशी प्रतिक्रिया आमदार गोगावले यांनी दिली आहे.

गावठी शब्दात एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल आम्हाला कोणाचा अपमान करायचा नव्हता. समोरची मंडळी आमच्यावर आरोप करतात त्यावेळी आम्हाला गावठी भाषेत जशास तस उत्तर द्याव लागत विरोधकांनी याची नोंद घ्यावी असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT