रायगड : शिवडी-ट्रान्स हार्बर सागरी सेतूचे (अटल बिहारी वाजपेयी सागरीसेतू) उद्घाटन 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.
मुख्य कार्यक्रम लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होणार असल्याने या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासह बुधवारी रात्री केली. सर्व यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. नागरिकांना त्रास होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे. महिलांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना सामंत यांनी केली.