कोलाड ः विश्वास निकम
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी असलेल्या आंबेवाडी प्रार्थमिक आरोग्य केंद्रात ऑक्सीजन सिलेंडरचा तुटवडा भासू लागल्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होताना दिसत असून, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आंबेवाडी हे मध्यवर्ती ठिकाणचे गाव आहे. परिसरातील 70 ते 75 खेडेगावातील ग्रामस्थ याच आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात व परिसरात ऑक्सीजन सिलेंडरचा अद्याप अभाव असल्याचे दिसून येत आहे.
ऑक्सीजन सिलेंडरचा मुख्यता उपयोग वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती जेव्हा रुग्णांना श्वास घेण्याचा त्रास होतो किंवा रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. तेव्हा त्यांना पूरक ( ) ऑक्सीजन पुरवण्यासाठी केला जातो. हे सिलेंडर फुफ्फुसाचे आजार ()दमा, निमोनिया, किंवा कोविड-19 सारख्या आजारामध्ये रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या तुलनेत सिलेंडर लगेच सुरु करता येतात यासाठी विजेची गरज नसते.यामुळे हे सिलेंडर प्रवासात किंवा आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरतात. यामध्ये ऑक्सिजन उच्च दाबाखाली स्ट्रील किंवा अलुमीनीयमच्या टाकीत साठवला जातो.आणि रेगुलेटरच्या द्वारे रुग्णांना आवश्यक तेवढेच ऑक्सीजन दिला जातो.
आंबेवाडी हे ठिकाणी मुंबईगोवा हायवेवरील मध्यस्थी ठिकाण असुन येथे असंख्य वाडया व वस्त्यावरील नागरिक आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात शिवाय या मार्गांवर दररोज असंख्य अपघात होत आहेत अशा वेळी ऑक्सीजन सिलेंडर फार महत्वाच्या मानले जाते तसेच दमा,श्वसनाचा गंभीर त्रास, निमोनिया,हार्ट अटॅक यासारख्या आजारावर ऑक्सीजन सिलेंडर महत्वाचे मानले जाते.परंतु आंबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंदसहित या परिसरात कोणत्याही ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होताना दिसत असुन लवकरच लवकर या परिसरात संबंधित नागरिकांकडून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध व्हावा.चंद्रकांत लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते