अलिबाग : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेतबाबत 15 मार्च 2024 चा व कंत्राटी शिक्षक भरतीबाबतचा 5 सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत. सदरचे दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत, या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा निर्धार नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व संघटनांच्या बैठकीत करण्यात आला.