आरोपीस दोषी ठरवत शिक्षा File Photo
रायगड

Government employee Attack: सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला महागात; अलिबाग सत्र न्यायालयाकडून आरोपीस दोषी ठरवत शिक्षा

कर्तव्यात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी भादंवि 353 व 333 अंतर्गत दंड व कारावास

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : सरकारी कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात अडथळा आणून त्याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अलिबाग येथील सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालय-3, अलिबाग येथील न्यायाधीश एस. डी. भगत यांच्या न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला.

या प्रकरणातील आरोपी विजय मारुती राठोड रा. अलिबाग कोळीवाडा, ता. अलिबाग, जि. रायगड) यास भा.दं.वि. कलम 353, 332 व 333 अंतर्गत दोषी ठरविण्यात आले. न्यायालयाने भा.दं.वि. कलम 353 अंतर्गत एक हजार रुपये दंड व एक महिना फक्त मजुरीची शिक्षा, तसेच भा.दं.वि. कलम 333 अंतर्गत तीन हजार रुपये दंड व एक महिना फक्त मजुरीची शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे.

थोडक्यात हकीगत अशी की, फिर्यादी अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत बीट मार्शल ड्युटीवर असताना रायगड कंट्रोल रूमकडून शास्त्रीनगर, गुरुजी हॉटेलजवळ कोळीवाडा येथे आरोपीने घरातील कपाटाची काच फोडल्याची माहिती पीटर मोबाईल अलिबाग यांना देण्यात आली. त्यानुसार फिर्यादी शासकीय कर्तव्य बजावत घटनास्थळी पोहोचले असता आरोपी घराबाहेर येऊन “तुम्हाला येथे कोणी बोलावले,

माझ्याकडे येण्याचा काय अधिकार आहे” असे म्हणत आक्रमक झाला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या अंगावर धाव घेऊन गणवेशाचा कॉलर पकडला, हातावर व छातीवर मारहाण केली. तसेच कपाटाच्या फुटलेल्या काचेने फिर्यादीस जखमी करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला व कर्तव्य पार पाडण्यापासून धाक दाखवून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT