Alibag Municipal Elections / अलिबाग नगरपरीषद Pudhari News Network
रायगड

Alibag Municipal Elections : अलिबाग नगरपरीषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात

भाजपा, शिवसेना (शिंदे) युतीला शेकाप-काँग्रेस आघाडीचे आव्हान, मतदानाविषयी उत्सुकता

पुढारी वृत्तसेवा

Alibaug Municipal Council elections

रायगड : अलिबाग नगरपरिषदेच्या होत असलेल्या निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात अत्यंत शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस विरुद्ध भाजपा, शिवसेना (शिंदे) युती अशी लढत होते आहे. १ डिसेंबरचा आणखी एक दिवस प्रचाराकरिता मिळाला आहे. थेट नगराध्यक्ष पदाकरिता शेतकरी कामगार पक्षा, काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अक्षया प्रशांत नाईक आणि भाजपा, शिवसेना (शिंदे) युतीच्या तनुजा पेरेकर यांच्यात लढत होत आहे.

नगरपालिकेच्या २० प्रभाग आणि नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे पारंपारीक विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र येत शेकाप काँग्रेस आघाडीला आव्हाने दिले आहे. नगर-सेवक पदासाठी एकुण ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभागक्रमांक दोन मधून भाजप उमेदवार संतोष साळुंखे यांनी अर्ज मागे घेतल्याने, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले आहेत. परिणामी शेकापने एका नगरसेवकाच्या विजयाचा गुलाल मतदानापूर्वीच उधळला आहे.

  • प्रभाग १ 'अ' मधून शेकाप-काँग्रेसचे संतोष गुरव आणि शिवसेनेचे यश पालवणकर तर १ 'ब' मधून शेकाप-कॉग्रेसच्या संध्या पालवणकर व भाजपाच्या रिद्धी मांजरेकर यांच्यात लढत होत आहे.

  • प्रभाग २ 'अ' मध्ये शेकापच्या सुशमा पाटील आणि सुजाता इंगळे (भाजप) यांच्यात लढत आहे. आणि २ 'ब' मध्ये शेकापचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक बिनविरोध विजयी झाले आहेत.

  • प्रभाग ३ 'अ' मधून शेकापच्या साक्षी गौतम पाटील आणि भाजपाच्या भक्ती वारगे तर ३ 'ब' मधून शेकापचे आनंद पाटील विरुद्ध रंजीता शिंदे (शिवसेना) याच्यात लढत होत आहे.

  • प्रभाग ४ 'अ' मध्ये शेकापच्या रेश्मा थळे, शिवसेनेच्या श्वेता पालकर आणि विजया पार्सेकर (भाजप) तर तर ४ 'ब' मध्ये शेकापचे महेष शिंदे, कृष्णनाथ चाळके (भाजप) व संदिप पालकर (शिवसेना) अशी लढत आहे. प्रभाग ५ 'अ' मधून शेकापच्या निवेदीता वाघमारे आणि अमिता सोनवणे (भाजप), तर ५ 'ब' मधून कॉंग्रेसचे समिर ठाकूर आणि राजेश प्रधान (भाजप) यांच्यात लढत होत आहे.

  • भाग ६ 'अ' मध्ये शेकापचे ऋषीकेश माळी आणि विकास कर्णेकर (शिवसेना) तर ६ 'ब' मध्ये शेकापच्या अश्विनी ठोसर आणि भाजपच्या पल्लवी जोशी यांच्यात लढत आहे. प्रभाग ७ 'अ' मधून ॲड. मानसी म्हात्रे आणि भाजपाच्या नईमा घट्टे तर ७ 'ब' मधून काँग्रेसचे अभय म्हामुणकर आणि ॲड. अंकित बंगेरा (भाजप) यांच्यात लढत आहे.

  • प्रभाग ८ 'अ' मध्ये शेकापच्या ॲड. निलम हजारे आणि रईसा अक्तर (भाजप), तर ८ 'ब' मधून शेकापचे अनिल चोपडा आणि अश्रफ घट्टे (शिवसेना) यांच्यात लढत आहे. प्रभाग ९ 'अ' मधून शेकापच्या योजना पाटील आणि वैजयंती पाटील (भाजप) तर ९ 'ब' मधून शेकापचे सागर भगत आणि मनीष पेरेकर (शिवसेना) यांच्यात लढत आहे. प्रभाग १० 'अ' मधून शेकापच्या शैला भगत प्रवीण भगत आणि प्रविण भगत (भाजप-सेना) तर १० 'ब' मधून शेकापच्या वृषाली भगत आणि विजेता सारंग (भाजप) यांच्यात लढत आहे. यंदा एकाही राजकीय पक्षाने जाहिर सभा घेतलेली नाही, स्टार प्रचारक अलिबागमध्ये आलेले नाहीत. सर्वच राजकीय पक्षांनी घरोघरी जावून मतदारांची प्रत्यक्ष भेट घेवून प्रचार करण्यावर जोर दिलेला आहे.

मतदारांनी मांडल्या नागरी समस्या

उमेदवार ज्यावेळी मतदारांच्या भेटीसाठी जात आहेत त्यावेळी अलिबाग शहरातील भेडसावणाऱ्या नागरी समस्या मतदार मांडत आहेत. यामद्ये घनकचरा व्यवस्थापन, पाणी प्रश्न, सांडपाणी व्यवस्थापन, त्यामुळे होणारी डासांची उत्पत्ती, वाढते नागरीकरण त्यामुळे वाढणारा यंत्रणेवरचा ताण, आंग्रे समाधी स्थळ, नमिता नाईक क्रिडा संकुल, दुबईच्या धर्तीवर होणारे अद्यावर मत्सालय, मच्छी मार्केट या प्रकल्पांची रखडलेली कामे, अरुंद रस्ते, वाहतुक कोंडी, पार्कीग सुविधांचा अभाव यासारखे मुद्दे मतदारांनी मांडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT