Alibag Maternity Pudhari
रायगड

Alibag Maternity: बाळाचा जन्म पण आईचा मृत्यू; अलिबाग जिल्हा रुग्णालयातील हृदयद्रावक घटना

प्रसूती सुरळीत झाल्यानंतर प्रकृती अचानक बिघडली; घटनेनंतर नातेवाईकांची पोलिसांत तक्रार प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : अलिबाग जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर एका 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून नवजात बाळ जिवंत राहिले असताना आईचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

विशाल विश्वनाथ दुर्गावले (रा. कुरुळ, ता. अलिबाग) यांची पत्नी विवा विशाल दुर्गावले (वय 32) या गरोदर असल्याने त्यांना 9 मार्च रोजी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 11 मार्च रोजी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रसूती होऊन त्यांनी एका बाळाला जन्म दिला. सुरुवातीला प्रसूती व्यवस्थित झाल्याचे सांगितले जात होते.

मात्र काही वेळातच विवा दुर्गावले यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर नवजात बाळाला स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले, तर विवा दुर्गावले यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच 12 मार्च रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली असून पोलिसांकडे तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. प्रसूतीनंतर आईचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT