Arecanut leaf spot disease Pudhari
रायगड

Arecanut leaf spot disease: हवामान बदलामुळे सुपारीच्या पिकांवर ठिपक्यांच्या रोगाचे संकट; बागायतदारांनी वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन

झाडाच्या वाढीसह उत्पादन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: तीव्र उन्हाळा आणि हवामान बदलामुळे सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसमोर पानांवरील ठिपके या रोगाचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. सुपारीच्या झाडांच्या पानांवर काळे व गडद तपकिरी ठिपके पडून पाने सुकण्याचा धोका असल्याने बागायतदारांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अलिबाग तालुक्यात सुमारे २२५ हेक्टर क्षेत्रावर सुपारीची लागवड असून चौल, आक्षी आणि नागाव या गावांमध्ये सुपारीचे क्षेत्र प्रामुख्याने आहे. या रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या सुपारीच्या झाडांवर अधिक दिसून येतो.

सुरुवातीला पानांवर लहान गोलाकार गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचे ठिपके पडतात. या ठिपक्यांच्या भोवती पिवळसर कडा तयार होते. कालांतराने ठिपके एकमेकांत मिसळून मोठे चट्टे तयार होतात. त्यामुळे पानांचा हिरवेपणा कमी होऊन पाने सुकतात आणि गळून पडतात.

परिणामी झाडाच्या वाढीवर आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी बागायतदारांनी सर्वप्रथम बागेतील स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. रोगग्रस्त, सुकलेली व गळून पडलेली पाने गोळा करून बागेबाहेर नष्ट करावीत.

पावसाळ्यात झाडांच्या मुळाशी पाणी साचणार नाही, यासाठी योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी. तसेच शिफारशीनुसार सेंद्रिय खतांचा आणि पोटॅशयुक्त खतांचा संतुलित वापर करावा.

रोगाचा प्रादुर्भाव दिसताच कृषी अविद्यापीठाच्या शिफारशी व कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार एक टक्का बोर्डो मिश्रण किंवा मॅन्कोझेबयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करता येते. प्रादुर्भाव अधिक असल्यास हेक्झाकोनॅझोल, प्रोपिकोनॅझोल यांसारख्या बुरशीनाशकांचा वापर करण्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

औषधांचे प्रमाण, फवारण्यांमधील अंतर आणि सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, एका बागेत रोगाचे नियंत्रण करून उपयोग होणार नाही. शेजारील बागांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास त्याचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे चौल, आक्षी, नागाव यांसह परिसरातील सर्व सुपारी बागायतदारांनी एकाच वेळी स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज आहे.

कमी वयाच्या झाडांवर रोगाचा अधिक प्रभाव

अलिबाग तालुक्यात सुमारे २२५ हेक्टर क्षेत्रावर सुपारीची लागवड असून चौल, आक्षी आणि नागाव या गावांमध्ये सुपारीचे क्षेत्र प्रामुख्याने आहे. या रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या सुपारीच्या झाडांवर अधिक दिसून येतो.

सुरुवातीला पानांवर लहान गोलाकार गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचे ठिपके पडतात. या ठिपक्यांच्या भोवती पिवळसर कडा तयार होते. कालांतराने ठिपके एकमेकांत मिसळून मोठे चट्टे तयार होतात. त्यामुळे पानांचा हिरवेपणा कमी होऊन पाने सुकतात आणि गळून पडतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT