जेएनपीए मार्गावर ट्रेलरची रिक्षाला धडक File Photo
रायगड

Accident | जेएनपीए मार्गावर ट्रेलरची रिक्षाला धडक ; एक ठार, दोघे गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

जेएनपीए : करळ फाटा ते जेएनपीए या मार्गाव पीयुबी न्हावा शेवा कस्टम ऑफिस नजिकच्या रोडवर बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रेलरची रिक्षाला धडक बसली.यामध्ये एक ठार,तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

रात्रपाळी करून केळवणे येथील भरत ठाकूर केळवणे, भोम येथील सचिन म्हात्रे आणि आकाश चौगुले हे तिघे रिक्षातून घरी येत होते. पी यु बी येथे आले असता समोरून येणार्‍या भरधाव ट्रेलरने रिक्षास जोरदार धडक दिली. यामध्ये भरत ठाकूर जाग्यावरच मयत झाले तर सचीन म्हात्रे, आकाश चौगुले यांस गंभीर मार लागला आहे. सदरचा अपघात पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष अनिकेत वसंत तांडेल हे ड्युटीवर जात असताना त्यांनी प्रत्यक्ष पाहिला व त्यांनी त्यांच्या संपर्कातील न्हावा शेवा पोलिस स्टेशनचे पी एस आय दिपक दाभाडे यांना संपर्क साधला. त्यांनी पोलीस व अ‍ॅम्ंब्युलन्स पाठवतो असे सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT