धारकऱ्यांच्या पिकअपला अपघात; १७ जण जखमी File Photo
रायगड

धारकऱ्यांच्या पिकअपला अपघात; १७ जण जखमी

कुंभळवणे जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने अपघात

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर : पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर-सुरूर राज्य मार्गवरील पोलादपूर हद्दीतील कुंभळवणे गावाजवळ धारकरींची पिकअप गाडी पलटी झाली. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील धारकरी उमरठकडे येत असताना हा अपघात झाला. यावेळी त्‍यांची पिकअप पलटी झाल्याने 17 जण जखमी झाले. ही घटना (शुक्रवार) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोप गावातील धारकरी नरवीर भूमी उमरठ ते किल्ले रायगड गडकोट मोहिमेत सहभागी होण्यासाठी महाबळेश्वर मार्गे पोलादपूरकडे येत असतात. पिकअप क्र 4632 वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पोलादपूर तालुक्यातील कुंभळवणे गावाजवळ पिकअप पलटी झाली. यामध्ये 17 धारकरी जखमी झाले. या जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्रथमिक उपचार करत पुढील उपचारांसाठी महाड ग्रामीण रुग्णालयात व माणगांवसह इतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

जखमींमध्ये अंकलखोप गावातील गणेश गायकवाड (वय 19) ,अक्षय पाटील (वय 25) ,सत्यम पुजारी (वय 21), ओंकार खामकर (वय 22), यश उपाध्ये (वय 23), सागर हौवली, (वय 27), पवनकुमार जाधव (वय 17) ,योगेश खामकर (वय 25), कुणाल उपाध्ये (17) , अवधूत कुलकर्णी (वय 28) ,पवन साळुंखे (वय 18) ,ओम कोळी (वय 19), आविष्कार शिंदे (वय 19) संकेत जाधव (वय 24) रोहन तलवार (वय 28) व विश्वंभर जोशी (वय 16) यांचा समावेश आहे.

सर्व जखमींना पोलीसांसह स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेद्वारे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करत सर्व जखमींना पुढील उपचारासाठी महाड माणगांवकडे हलविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT