भरधाव कार पलटी झाल्याने अपघात pudhari photo
रायगड

वाढदिवशीच तरुणाला मृत्यूने गाठलं, भरधाव कार पलटी झाल्याने अपघात

पुढारी वृत्तसेवा

पनवेल ः मित्रांसह वाढदिवसाचा केक कापून फॉर्च्युनर कारमधून मित्रांसह घराच्या दिशेने निघालेल्या तरुणाची कार पलटी झाल्याने अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उलवे येथे घडली. अनिकेत बाळू पवार (वय 29 वर्षे) असे या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघातात त्याचे इतर 6 मित्र किरकोळ जखमी झाले आहेत. Ulwe Car Accident

मृत अनिकेत पवार उलवे येथील एका ट्रान्सपोर्टरकडे चालक म्हणून काम करत होता. अनिकेतचा वाढदिवस असल्याने मध्यरात्री त्याच्या मित्रांनी त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. त्यासाठी अनिकेतने आपल्या मालकाची फॉर्च्युनर कार घेतली होती. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजता अनिकेत आणि त्याचे 6 मित्र फॉर्च्युनर कारने न्हावा गावात गेले होते. यावेळी अनिकेतने वाढदिवसाचा केक कापल्यानंतर जेवण करुन सर्व मित्र रात्री 12.30 वाजता आपल्या घरी येण्यासाठी निघाले. यावेळी न्हावा गांव येथून उलवेच्या दिशेने भरधाव वेगात येत असताना, तेथील वळणावर अनिकेतचे कार वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांच्या फॉर्च्युनर कारने 2-3 वेळा पलटी मारुन पडली. या अपघातात अनिकेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला गंभीर जखमी अवस्थेत बेलापूर येथील अपोलो हॉस्पीटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. न्हावाशेवा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात अनिकेतचे मित्र किरकोळ जखमी झाले असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनिकेतचा वाढदिवशीच अपघाती मृत्यू झाल्याने त्याचे मित्र मंडळी आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT