रायगड

रायगडच्या किनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडली

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा – रायगडच्या किनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडली आहे. ही माहिती समजताच तटरक्षक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबईच्या समुद्रात ९० नॉटिकल माईल्स अंतरावर खोल समुद्रात ही संशयास्पद बोट आहे. भारतीय नौदलाचे पथक तेथे पोहोचले असून तपास सुरु असल्याची माहिती रायगड अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. ९० नॉटिकल माईल्स हे क्षेत्र पोलिस आणि कोस्ट गार्डच्या हद्दीच्या बाहेर असल्याने नौदलाकडून ही कार्यवाही करण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT