महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीतील सदस्यांना घेवून जाताना पोलिस कर्मचारी Pudhari Photo
रायगड

रायगड : दिवसा नोकरी अन् रात्री चोरी करणारी टोळी गजाआड

पुढारी वृत्तसेवा

पनवेल प्रतिनिधी   : दिवसा नोकरी करून रात्रीच्यावेळी एक्सप्रेस महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीतील ५ जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांच्या अटकेमुळे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीसह खालापूर व परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपुरी यांनी व्यक्त केली आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग, पुणे लेनवर ट्रक क्र (एमएच १४ केक्यु ५००८) वरील चालक फिर्यादी गेंदलाल रामगरीब पटेल हे लघुशंके करता उतरले होते. तेव्हा पाच ते सात अज्ञातांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना बेदम मारहाण करत त्याच्याकडील २ मोबाईल आणि २३ हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची नोंद केली होती. या घटनेनंतर पनवेल तालुका पोलिसांनी सदर दाखल गुन्हयाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक तयार केले.

यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना सदर गुन्हयाचा तांत्रिक व गोपनिय माहितीद्वारे तपास सुरु केला. तसेच या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या ०८ आरोपींपैकी संशियत आरोपी रोहन उर्फ गुड्डु गोपीनाथ नाईक (वय २४ वर्षे), रोहिदास सुरेश पवार (वय २३ वर्षे), आतेश रोहिदास वाघमारे, (वय २६ वर्षे,) मनिष काळुराम वाघमारे (वय ३५ वर्षे), शंकर चंदर वाघमारे, (वय १८ वर्षे ५ महिने) यांना सापळा रचून अटक केलेली आहे.

सदर गुन्हयातील इतर ३ आरोपींचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना २० सप्टेंबर २०२४ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेली आहे. या आरोपींकडून एकुण- रु. ४८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात ४१ हजार रुपयांचे ०५ मोबाईल फोन, ७ हजार रोख रक्कमेचा समावेश आहे. सदर गुन्हयातील अटक आरोपी रोहन उर्फ गुड्डु गोपीनाथ नाईक हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापुर्वी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे २ व खालापुर येथे ०१ जबरी चोरी व दरोडयाचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT