नववर्ष स्वागतासाठी विनापरवानगी पार्ट्यांचे आयोजन करणार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिला आहे. file
रायगड

31st party | आला थर्टीफर्स्ट... तळीरामांवर नजर | विनापरवानगी पार्ट्यांवर कारवाईचा इशारा

उत्पादन शुल्कतर्फे 7 भरारी पथके तैनात

पुढारी वृत्तसेवा

रायगड | 2024 वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या जल्लोषाची जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातील पोलीस, उत्पादन शुल्क विभागासह विविध विभागांनी तयार सुरु केली आहे. रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्हयात 5 कार्यकारी निरीक्षक आणि 2 भरारी निरीक्षक पथके कार्यरत आहेत. जिल्ह्यातील मद्यविक्री आस्थापनामध्ये परराज्यातील मद्य तसेच बनावट मद्य विक्री होणार नाही याबाबत सर्व पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत. परराज्यातील मद्यविक्री होणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रविकिरण कोले यांनी दिली. नववर्ष स्वागतासाठी विनापरवानगी पार्ट्यांचे आयोजन करणार्‍यांवर कारवाई करण्याचा इशाराही विभागाने दिला आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना अवैध मद्य विक्री व हातभट्टी विकीवर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यात परराज्यातून येणार्‍या मद्यावर कारवाई करण्याकरीता प्रमुख रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे विभागाशी समन्वय साधून संशयित आढळून येणार्‍या व्यक्तीच्या सामानाची तपासणी तसेच रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात येवून परराज्यातून येणार्‍या संशयित वाहनांची तपासणी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नववर्षानिमित्त या जिल्हयात मोठया प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी एकदिवशीय परवाना न घेता विनापरवाना मद्य वितरण होत असल्यास संबंधीतावर कठेार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हयातील रिसार्ट, हॉटेल, कॉटेज, फार्महाऊस या विभागाची तात्पुरती कल्ब अनुज्ञप्ती प्राप्त करुनच कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

उत्पादन शुल्क विभागाची विधीग्राह्य अनुज्ञप्ती धारण न करता अवैधरित्या मद्यविक्री करणार्‍या हॉटेल व ढाब्यावर कठोर कारवाई करावी तसेच अवैध मद्यविक्री करणार्‍या हॉटेल, ढाब्याचे मालक व जागामालक यांचेवर प्रामुख्याने गुन्हा नोंद करण्यांबाबत सूचना या विभागातील अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्हयामध्ये 1 एप्रिल 2024 ते 26 डिसेंबर 2024 या कालावधीत एकूण 1 हजार 755 गुन्हे नोंदविण्यात आले असून एकूण 1 हजार 640 आरोपींना अटक करण्यात आले आहे. या कारवायांमध्ये 78 वाहने जप्त करण्यात आली असून एकूण रुपये 5 कोटी 60 लाख 59 हजार 987 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत व्हॉटस 842200 1133 व टोल फ्री 1800 23 39999 वर संपर्क साधनेबाबत जिल्ह्यात अनेक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. या क्रमांकावर येणार्‍या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यात ज्या हॉटेल आस्थापनामध्ये तसेच बॅक्वेट हॉल, सोसायटी क्लब हाऊस, मैदाने या ठिकाणी जर नववर्षाच्या अनुषंगाने पार्टीचे आयोजन करण्यात येणार असेल तर सदर ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत वितरीत करण्यात येणार्‍या एकदिवसीय अनुज्ञप्तीची परवानगी घेण्यात यावी. विना परवानगा पार्टीचे आयोजन केले असल्याचे आढळून आल्यास आयोजक- जागामालक यांच्यावर नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर सध्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. जिलह्यातील हॉटेल्स, कॉटेजसची बुकींग मोठ्या प्रमाणात होत आहे. तर 31 डिसेंबर रोजी होणार्‍या पार्ट्यांचे नियोजन ठिकठिकाणी सुरु झाले आहे. स्थानिक पातळीवरही नववर्षाचा जल्लोष होत असतो, त्यामुळे ग्रामीण भागातही सध्या थर्टीफर्स्टचे वारे वाहू लागले आहेत.

ऑनलाईन परवानगी

ज्या हॉटेल आस्थापनामध्ये तसेच बॅक्वेट हॉल, सोसायटी क्लब हाऊस, मैदाने या ठिकाणी आपण जर नववर्षाच्या अनुषंगाने पार्टीचे आयोजन करण्यात येणार असेल तर सदर ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत वितरीत करण्यात येणार्‍या एकदिवसीय अनुज्ञप्तीची परवानगी घेण्यात यावी. विना परवानगा पार्टीचे आयोजन केले असल्याचे आढळून आल्यास आयोजक जागामालक यांच्यावर नियमातील तरतुदीनुसार रितसर कारवाई करण्यात येईल. विशेष कार्यक्रमासाठी परवानगी महाराष्ट्र शासनाच्या हीींिीं// ररश्रिश ीरीज्ञरी. ारहरेपश्रळपश. र्सेीं.ळप/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने वितरीत करण्यात येत आहे. नागरिकांना ही सुविधा ठरणार आहे.

1755 गुन्ह्यांची नोंद

रायगड जिल्हयामध्ये 1 एप्रिल 2024 ते 26 डिसेंबर 2024 या कालावधीत एकूण 1 हजार 755 गुन्हे नोंदविण्यात आले असून एकूण 1 हजार 640 आरोपींना अटक करण्यात आले आहे. या कारवायांमध्ये 78 वाहने जप्त करण्यात आली असून एकूण रुपये 5 कोटी 60 लाख 59 हजार 987 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT