Raigad Crime News:
महाड : रायगडमधील महाड तालुक्यात दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सुतारकाम करणाऱ्या सचिन पांडुरंग सुतार (वय ३७, रा. कुंभारकोंड, वरंध, ता. महाड, जि. रायगड) याला अटक केली आहे. या घटनेची नोंद महाड एम.आय.डी. सी पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पिडीत मुलीची आई मजुरीसाठी तर वडील गावी गेल्याने मुलगी घरात एकटी होती. संशयित सुतार याने याचा गैरफायदा घेत पाणी पिण्याच्या बहाण्याने पिडीत मुलीला घरात नेले आणि तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रक्ररणी पिडीत मुलीच्या आईने महाड MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीने पीडितेच्या छातीला स्पर्श करत लैंगिक छेडछाड केली. छातीवर बसून जबरदस्ती केली. तसेच याबाबत कुणाला सांगितले तर गळा दाबून ठार मारीन, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.