पुणे

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी 50 खांब

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हिंजवडी-शिवाजीनगर यादरम्यान मेट्रोच्या तिसर्‍या मार्गासाठी गेल्या सहा महिन्यांत पन्नास खांबांची उभारणी करण्यात आली आहे. पन्नासाव्या खांबाची उभारणी सोमवारी सायंकाळी झाली. मेट्रो स्थानक बांधण्यासाठी पाया घेण्याचे कामही हाती
घेण्यात आले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या मेट्रोच्या उभारणीचे काम मार्च 2022 मध्ये सुरू झाले.

तीन ठिकाणी खांब उभारणीस त्यांनी सुरुवात केली. हिंजवडी आयटी पार्कमध्ये मेट्रो स्थानक उभारणीस प्रारंभ झाला आहे. पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर म्हणाले, 'दोन हजार मिलिमीटर व्यास असलेले गोलाकार खांब वैशिष्ट्यपूर्ण आहेत. भारतीय मानक ब्युरो तसेच बांधकाम प्रक्रियेशी सुसंगत असलेल्या डिझाइनमध्ये सर्वोच्च सुरक्षा मानकांचे पालन करीत या खांबांची उभारणी करण्यात येत आहे. पुणे मेट्रोचा तिसरा मार्ग 23 किलोमीटर लांबीचा आहे. या उन्नत मेट्रो मार्गावर 23 स्थानके आहेत.'

SCROLL FOR NEXT