पुणे

सोयाबीनचा पेरा 121 टक्क्यांवर; खरीप हंगामातील एकूण पेरणी 25 टक्के पूर्ण

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र 1 लाख 84 हजार 274 हेक्टर असून, त्यापैकी 45 हजार 668 म्हणजे सरासरीच्या 25 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 17 हजार 482 हेक्टर असून, त्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल 21 हजार 67 हेक्टरवर (121 टक्के) पेरा पूर्ण झाला आहे. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी दिली.

जिल्ह्यात अद्यापही काही तालुक्यांतील मंडळनिहाय पाऊस न झाल्याने पेरण्यांखालील क्षेत्र कमी दिसून येत आहे. सोयाबीन पिकाखालील जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र कमी आहे. मात्र, शेतकर्‍यांचा कल सोयाबीनकडे वाढला आहे. गतवर्षी जिल्ह्यात सोयाबीनची दुप्पट म्हणजे 36 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. पावसाची सध्याची हजेरी यापुढेही कायम राहिल्यास यंदाही सोयाबीनच्या क्षेत्रात आणखी वाढ शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्याचे जून महिन्यातील सरासरी पर्जन्यमान 176 मिलिमिटर असून, प्रत्यक्षात 83 मिलिमीटर इतका म्हणजे सुमारे 47 टक्क्यांइतका पाऊस झालेला आहे. तर, चालू महिन्यात 8 जुलैपर्यंत सरासरी 309 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत 105 मिलिमीटर म्हणजे सुमारे 34 टक्क्यांइतका पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात हवेली, मुळशी, भोर व पुरंदर तालुक्यात अद्यापही आजअखेर सरासरीच्या तुलनेत 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याचे त्यांनी सांगितले.

तालुकानिहाय झालेली पेरणी हेक्टरमध्ये
पुढीलप्रमाणे : हवेली 821, मुळशी 67, भोर 1670, मावळ 253, वेल्हे 200, जुन्नर 11931, खेड 10711, आंबेगाव 2914, शिरूर 8202, बारामती 5066, इंदापूर 1356, दौंड 1492, पुरंदर 985 हेक्टरवरील पेरणी पूर्ण झालेली आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांची स्थिती : क्षेत्र हेक्टरमध्ये
मुख्य पिके          सरासरी क्षेत्र                पेरणी क्षेत्र             टक्केवारी
भात                     57964                      6161                रोपवाटिका 11
बाजरी                  38761                      8282                     21
मका                    17131                      6405                     37
मूग                      13804                      4731                     34
भुईमूग                  16090                     1457                       9
सोयाबीन               17482                    21067                   121

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT