पुणे

सेवानिवृत्त शिक्षिकेची 54 हजारांची फसवणूक, गुन्हा दाखल

अमृता चौगुले

पिंपरी : कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून एका सेवानिवृत्त शिक्षिकेची 54 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 3 जून रोजी संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी प्रियांका अलख्य पॉल (वय 61) यांनी गुरुवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रियंका पॉल या पिंपरीतील राहत्या घरी असताना त्यांना मोबाईल क्रमांकावर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. सदर व्यक्तीने त्यांना मी स्टेट बँक ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगितले, तुमचे क्रेडीट कार्ड अपडेट करावयाचे असल्याचे सांगून आरोपीने त्यांच्याकडून कार्डाची माहिती घेतली.

त्यानंतर कार्ड अपडेटच्या बहाण्याने त्यांना मोबाईलवर आलेला ओटीपी विचारुन घेत, आरोपीने सुरुवातीला त्यांच्या बँक खात्यातून 25 हजार रुपये ऑनलाईन काढून घेतले. त्यानंतर 14 हजार 636 आणि पुन्हा 14 हजार 636 रुपये असे एकूण 54 हजार 273 रुपये काढून घेत फसवणूक केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT