पुणे; पुढारी वृत्तसेवा: स्वा. सावरकर यांची दहशत वाढली पाहिजे. यापुढे सावरकरप्रेमी आला म्हटलं, की दहशत वाढली पाहिजे, असे परखड मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या वतीने 'मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर' या सावरकरांच्या साहित्यावरील नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचनाचा कार्यक्रम रविवारी आयोजित केला होता. त्या वेळी पोंक्षे बोलत होते.
ते म्हणाले, 'रोज सकाळी उठल्यावर विरोधकांना सावरकर लागतात. ही मुले बघा आणि दिल्लीतला मुलगा बघा. एवढा मोठा झाला तरी गोळवलकर म्हणता येत नाही, असे सांगत पोंक्षे यांनी नाव न घेता काँग्रेस नेते राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. माझे स्नेही एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना या कार्यक्रमाची डीव्हीडी जबरदस्तीने बघायला लावेन. शाळांमध्ये हा कार्यक्रम झाला पाहिजे, असे पोंक्षे यांनी म्हटले आहे.