पुणे

सावत्र बापाला सक्तमजुरीची शिक्षा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा; आईसह लहान भावाला जिवे मारण्याची धमकी देत नववीत शिकणार्‍या मुलीवर बलात्कार करणार्‍या 30 वर्षीय सावत्र बापाला न्यायालयाने वीस वर्षे सक्तमजुरी व 60 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त दोन वर्षे कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत 14 वर्षीय पीडितेच्या आईने कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली होती. 12 ऑक्टोबर 2017 आणि त्यापूर्वीच्या आठ महिन्यांच्या कालावधीत ही घटना घडली होती.

पीडितेच्या वडिलांचे निधन झाल्याने तिच्या आईने आरोपीशी लग्न केले. पीडित नववीत शिकत होती. आईने तिला मावशीकडे मुंब्रा येथे पाठविले. त्यावेळी आठ महिन्यांपासून आरोपी अश्लील कृत्य आणि बलात्कार करत असल्याचे तिने मावशीला सांगितले. त्यानंतर ही घटना उघड झाली. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस नाईक अंकुश केंगले यांनी मदत केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT