पुणे

संतोष जाधवसह साथीदारांवर मोक्का; मुसेवाला हत्या प्रकरण

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधव आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संतोष सुनील जाधव (रा. पोखरी, ता. आंबेगाव), जीवनसिंग दर्शनसिंग नहार, श्रीराम रमेश थोरात (दोघे रा. मंचर, ता. आंबेगाव), जयेश रतीलाल बहिरट, जिशान इलाहीबक्श मुंढे (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव), गणेश तारू, वैभव उर्फ भोला शांताराम तिकटारे (रा. जळकेवाडी, ता. आंबेगाव), रोहित विठ्ठल तिकटारे (रा. सरेवाडी, ता. खेड), सचिन बबन तिकटारे (रा. नायफड. ता. खेड) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात मोक्का कारवाई केली आहे.

नारायणगावमधील एका व्यावसायिकाला संतोष जाधव टोळीतील साथीदारांनी खंडणी मागितली होती. याबाबत व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आरोपी नहार, थोरात, बहिरट, मुंढे, तिकटारे, तारू यांच्यासह अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावास नुकतीच मंजुरी देण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे तपास करत आहेत.

जाधवचा गुन्हेगारी प्रवास
जाधव याने वैमनस्यातून गेल्या वर्षी मंचर परिसरात ओंकार ऊर्फ बाणखेले याचा खून केला होता. या प्रकरणात त्याच्याविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली होती. कारवाई केल्यानंतर जाधव मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये पसार झाला होता. त्यानंतर पंजाबमधील गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला होता. बिष्णोई टोळीने सिद्धु मुसेवाला यांची हत्या घडवून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT