पुणे

शेतीपूरक व्यवसाय अडचणीत

अमृता चौगुले

दिवे : पुढारी वृत्तसेवा: दिवे परिसरात पाऊस लांबल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. शेतकरी संकटात सापडला आहेच शिवाय शेतीपूरक व्यावसायिकही अडचणीत सापडले आहेत. लाखो रुपयांची गुंतवणूक करून खरेदी केलेले बियाणे व इतर शेतीपूरक वस्तू ग्राहकांअभावी शिल्लक आहेत.

या वस्तू मुदतीत विकल्या गेल्या नाहीत तर त्या बाद होतात. पाऊस लांबल्याने सर्वांचेच आर्थिक गणित बिघडले आहे. कृषिनिविष्ठा विक्रेत्यांच्या दुकानात शुकशुकाट आहे.

SCROLL FOR NEXT