पुणे

शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेलातील घसरण सुरूच

अमृता चौगुले

पुणे : येथील बाजारात खाद्यतेलांमधील घसरण सुरूच असून गेल्या आठवड्यातही शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेले आणि वनस्पती तुपाच्या दरात मोठी घट झाली. आवक जावक साधारण असल्यामुळे अन्नधान्ये, गूळ, साखरेसह अन्य जिनसांचे दर स्थिर होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि पामोलिन तेलाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. सध्या आयातही मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, उठाव कमी असल्यामुळे खाद्यतेलांमधील घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही सर्वच खाद्यतेलांच्या दरात मोठी घट झाली.

पामतेलाच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे 100 ते 125 रुपयांनी तर शेंगदाणा तेलासह अन्य सर्व खाद्यतेलांच्या दरात 50 ते 60 रुपयांनी घट झाली. मागणी अभावी वनस्पती तुपाच्या दरातही 15 किलोमागे शंभर ते सव्वाशे रुपयांनी घट झाली. आवक जावक साधारण असल्यामुळे गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदळाचे दर स्थिर होते. गुळाची आवक कमी प्रमाणात होत असून मागणी चांगली असल्याने दरवाढ कायम असल्याचे सांगण्यात आले. मागणी कमी असल्यामुळे गेल्या आठवड्यातही साखरेच्या दरात कोणताही बदल आढळला नाही. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रती क्विंटलचा दर 3500 ते 3550 रुपये होता.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे :

साखर (प्रतिक्विंटल) 3500-3550 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल 2700-2750, रिफाईंड तेलः 2500-3100, सरकी तेल 2150-2600, सोयाबीन तेल 2100-2250, पामतेल 1850-2150, सूर्यफूल रिफाईंड तेल 2470-2650, वनस्पती तूप 1900-2600, खोबरेल तेल 2450-2500 रु.
तांदूळ :- गुजरात उकडा 3300-3500, मसुरी 2800-3000, सोनामसूरी 3800-4200, एच.एम.टी. कोलम 4000-4500, लचकारी कोलम 5000-5500, चिन्नोर 4000-4500, 1121-9000-10000, आंबेमोहोर (सुवासिक) 6500-7500, बासमती अखंड 11000-11500, बासमती दुबार 8000-8500, बासमती तिबार 9000-9500, बासमती मोगरा 4500-5500, बासमती कणी 3500-3800, 1509-6500-7000, 1121 10000-11000 रु.

गहू :- सौराष्ट्र लोकवन नं. 1 3400-3700, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3200-33200, एम.पी. लोकवन 2800-3200, सिहोर नं. 1 4700-5200, सिहोर नं. 2 4200-4500, सिहोरी 3200-3600, मिलबर 2550-2600 रु. ज्वारी :- गावरान नं. 1-4000-4300, गावरान नं. 2-3400-3700, नं. 3 3000-3200, दूरी 2400-2600 बाजरी :- महिको 3000-3200, गावरान 2600-2800, हायब्रीड 2400-2500 रु.
गूळ :- गूळ एकस्ट्रा 3750-3900, गूळ नं.1 3550-3650, गूळ नं.2 3400-3500, गूळ नं.3250-3350, बॉक्स पॅकिंग 3600-4600 रु.

डाळी :- तूरडाळ 8500-9500, हरभराडाळ 5800-6000, मूगडाळ 8500-9000, मसूरडाळ 8500-8600, मटकीडाळ 11500-11800, उडीदडाळ 90000-10300 रु. कडधान्ये :-हरभरा 5500-5600, हुलगा- 65000, चवळी 7500-8000, चवळी भारी 8000 मसूर 7400-7500, मूग 7500-8000, मटकी गावरान 12500-, मटकी पॉलिश 10000, मटकी गुजरात 10000, मटकी राजस्थान 10000, मटकी सेलम 13000-13500, वाटाणा हिरवा 5500-6000, वाटाणा पांढरा 6400-6500, काबुली चणा 9000-11000 रु.

साबुदाणा :- साबुदाणा नं.1 5200, साबुदाणा नं.2 5000, साबुदाणा नं.3 4700 रु. वरई भगर :-11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1500-1800 रु. शेंगदाणा :- जाडा 10000-10500, स्पॅनिश – 10500, घुंगरु 9500, टीजे 9100 रु. धने :- गावरान 16000-18000, इंदूर 20000-22000 रु. मका लाल 2450-2550, पिवळा 2475-2525, पांढरा 2700-2900 रु.

पोहे :- मध्य प्रदेश 3500-3900, पेण 3300-3500 मध्यम पोहा-3400-3600, दगडी पोहा 3200-3600, पातळ पोहा 3900-4400, सुपर पोहा 3800-4000, भाजका पोहा 500-525, मका पोहा 575-625, भाजके डाळे 2650-3050, मुरमुरा (10 किलोस) 430-440, भडंग 650-700, घोटी 410-420, सुरती 430-440 रु. रवा, मैदा, आटा- (50 किलोचा भाव) आटा 1350-1425, रवा 1425-1450, मैदा 14250-1450 रु. बेसन :- (50 किलोस) 3250-3550 रु. मीठ :- मीठ खडे (50 किलोस) 230, मीठ दळलेले (50 किलोस) 260 रु.

मिरची :- ढब्बी 42000-45000, काश्मिरी ढब्बी 41200-45000, ब्याडगी 30000-35000, लवंगी तेजा 19000-20000, गुंटूर 19000-20000, 341- 20000-23000, खुडवा गंटूर 5500-6000, खुडवा ब्याडगी 4000- 4500 रु.
नारळ :- (शेकड्याचा भाव): नवा नारळ पॅकिंग 1300-1500, मद्रास 2900-3000.

SCROLL FOR NEXT