पुणे : टेम्पोचे भाडे मागितल्याच्या कारणावरून 35 वर्षीय व्यक्तीसह त्याच्या मित्रांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणात दत्तवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली. स्वप्निल नारायण फाले (वय 25), तुषार दशरत कडू (वय 18, दोघेही रा. हनुमाननगर, दत्तवाडी) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत रक्षाराम भागेलू यादव (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे. 19 जून रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास दत्तवाडी परिसरातील साद बेकरीजवळ ही घटना घडली. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वर्षा असलेकर यांनी केली.