पुणे

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मिरवणूक

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिवस्वराज्य दिन चिरायू होवो… जय भवानी जय शिवाजी… हर हर महादेवचा जयघोष आणि ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांच्या आतषबाजीने वानवडीचा परिसर दणाणून गेला. पारंपरिक वेशात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

रथावर विराजमान झालेल्या शिवरायांच्या विलोभनीय मूर्तीला नमन करण्याकरिता उपस्थित नागरिकांच्या साक्षीने शिवराज्याभिषेकदिनी वानवडीमध्ये पहिल्या शिवस्वराज्य दिन मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राजमाता जिजाऊ फाउंडेशनतर्फे वानवडीत संविधान चौक ते शिवाजी महाराज स्मारक या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीचे उद्घाटन शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते झाले. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष नंदकिशोर बुट्टे पाटील, उपाध्यक्ष अनिल रोकडे, राजेंद्र सुपेकर व वानवडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT