शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: शिक्रापूर (ता. शिरूर) येथून कारची चोरी झाली. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापुरातील पाटवस्ती या ठिकाणी राहणारे नितीन चाकने यांनी 6 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास त्यांची कार (एमएच 14 बीए 1673) घरासमोरील मोकळ्या जागेत लावली होती.
सकाळी चाकने यांना घरासमोर लावलेली कार दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला तसेच परिसरात शोधाशोध केली. परंतु, कार आढळली नाही. त्यानंतर त्यांनी कार चोरीस गेल्याची तक्रार दिली. पोलिस नाईक संतोष मारकड तपास करीत आहेत.