पुणे : पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे 13 तालुक्यांतून नवीन शवदाहिनी मिळावी, यासाठी 686 प्रस्ताव आले आहेत. जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत दोन स्मशानभूमी आहेत. त्याठिकाणी आजूबाजूच्या वाड्या -वस्त्यावरील लोक अंत्यसंस्कारासाठी येत असल्याने स्मशानभूमीच्या यंत्रणेवर ताण येतो.
जिल्ह्यातील एक हजार 385 ग्रामपंचायतींसाठी दोन हजार स्मशानभूमी असल्या, तरी त्याची संख्या अपुरी पडत आहे. काही स्मशानभूमीमध्ये मूलभूत सुविधांची वानवा आहे. साधारण 150 ठिकाणी आरसीसीमध्ये स्मशानभूमी उभारण्याचा प्रस्ताव आहे. तर, काही ठिकाणी पाण्याची सोय नाही. काही ठिकाणी रस्ता नसल्याने अडचणींचाही सामना करावा लागतो.
जिल्ह्यात 150 स्मशानभूमीचे आरसीसी बांधकाम करण्यात येणार आहे. शवदाहिनी मिळावी, यासाठी जिल्ह्यातून 686 प्रस्ताव आले आहेत. त्याही देण्यात येतील.
– सचिन घाडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पं.स.