पुणे

वेल्हे : मालखेड, खानापूरला पोलिस बंदोबस्त

अमृता चौगुले

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पानशेत रस्त्यावरील मालखेड व खानापूर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या निवडणुकीत युवकांनी बाजी मारली. गुरुवारी (ता. 4) झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विक्रमी मतदान झाले होते. शुक्रवारी (दि.5) मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हवेली पोलिसांनी सकाळपासून गावात बंदोबस्त तैनात केला. बहुतेक विजयी उमेदवार प्रथमच सदस्य झाले आहेत. मालखेड ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी 14, तर खानापूरच्या 11 जागांसाठी 25 उमेदवार रिंगणात उतरले होते. निवडणूक अधिकारी म्हणून ए. एस. मुल्ला यांनी काम पाहिले.

मालखेड ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
हर्षदा अनिकेत खाटपे, विशाल दिलीप गोर्‍हे, सायरा अहमद खान, नंदा लालदास जोरी, गौतम परशुराम खाटपे, सुजाता तुकाराम खाटपे, चेतन सदाशिव भालेराव. निवडणूक अधिकारी शिवाजी खटके यांनी निकाल
जाहीर केला.

खानापूर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
सुधाकर बबन गायकवाड, प्रियंका प्रमोद जावळकर, केतन तानाजी जावळकर, शिल्पा सुधाकर गायकवाड, शीतल लक्ष्मण जावळकर, सचिन प्रकाश जावळकर, संगीता विशाल दिवार, अनिल मारुती जावळकर, तेजश्री ऋषिकेश जावळकर, प्रिया सागर वाघ व विश्वनाथ पोपट जावळकर.

SCROLL FOR NEXT