‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’चे उद्घाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. 
पुणे

रेल्वेच्या रुग्णालयात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: रेल्वेच्या रुग्णालयात नुकतेच मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ आरोग्य सल्लागार डॉ. संजय आठवले, विभागीय रेल्वे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. कनकराई, अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश निकाळजे,

डॉ. ए. के. मिश्रा, डॉ. नीती आहुजा, डॉ. शीतल वाघमारे, डॉ. नवीन कुमार, डॉ. अंकिता धारुवेला, डॉ. आशना रहमत व रुग्णालयाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नव्याने तयार केलेल्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये सर्व प्रकारच्या सुपर स्पेशालिटी शस्त्रक्रिया करणे सोपे आणि सुरक्षित होणार आहे.

याद्वारे दिल्या जाणार्‍या सेवांचा दर्जा आणखी चांगला झाला असून, हे ऑपरेशन थिएटर अँटी-बॅक्टेरियल वॉल आणि लॅमिनर एअर फ्लोने सुसज्ज आहे. या सुविधांनी सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये केल्या जाणार्‍या जटिल आणि सामान्य शस्त्रक्रियांमध्ये संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल. हाडे आणि सांधे यांच्याशी संबंधित जटिल शस्त्रक्रिया येथेच केल्या जाणार असल्यामुळे अशा रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची गरज भासणार नाही, असे डॉ. आठवले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT