पुणे

राज्यात दोन दिवस मध्यम पाऊस; 90 टक्के राज्यात यलो अलर्ट

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मोठा पाऊस कमी झाला असला, तरीही अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने सोमवारी (दि. 18) राज्यातील 90 टक्के भागाला यलो, तर गडचिरोली व गोंदियाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 19) काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडेल; मात्र 20 नंतर पाऊस कमी होईल. अरबी समुद्रातील तीव्र  कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात, प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशात पाऊस वाढला आहे.

महाराष्ट्रात त्यामुळे 18 व 19 रोजी मध्यम पावसाचा अंदाज आहे. राज्यातील 90 टक्के भागात सोमवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. फक्त सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद येथे पाऊस नाही, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांना 18 रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 19 रोजी फक्त विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला असून, उर्वरित राज्यातून पाऊस कमी होत आहे.

आज ऑरेंज अलर्ट: गोंदिया, गडचिरोली

आज येथे यलो अलर्ट: 
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, बीड, परभणी, अकोला, अमरावती, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर

उद्या यलो अलर्ट:
औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली

SCROLL FOR NEXT