पुणे

राजगड, तोरणा भागात मुसळधार

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा: राजगड, तोरणा भागासह वेल्हे तालुक्यात शनिवारी (दि. 9) सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. ओढे नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धानेप येथील गुंजवणी धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. गुंजवणी धरणात 32.26 टक्के साठा झाला आहे. सायंकाळनंतर पडलेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली.

दिवसभरात 45 मिलीमीटर पाऊस पडला. दि. 1 जूनपासून दि. 9 जुलैपर्यंत गुंजवणी धरण माथ्यावर 495 मिलीमीटर पाऊस पडला. रायगड जिल्ह्यालगतच्या पासली, केळद, वरोती, घिसर, भागात अतिवृष्टीमुळे ओढ्यांना पूर आले आहे. बालवड, पासली परिसरात रस्ते, पिके पाण्यात बुडाली आहेत. वेल्हे येथील शेतकरी रामभाऊ राजीवडे म्हणाले, 'जोरदार पावसामुळे घराबाहेर पडता येत नाही. जनावरेही सोडली नाही.'

SCROLL FOR NEXT