पुणे

योजनांसाठी स्वतंत्र संचालनालय; प्रौढ शिक्षण संचालनालयाचे नामांतर

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडील योजना आता स्वतंत्र संचालनालयाच्या माध्यमातून राबवल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असणार्‍या अल्पसंख्याक आणि प्रौढ शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालनालय (योजना) असे नामांतर करण्यात आले आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या योजना जिल्हास्तरावर राबवण्याचा विचार शासनाकडून करण्यात येत होता.

त्यानुसार अल्पसंख्याक आणि प्रौढ शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालनालय (योजना) असे नामांतर करून अल्पसंख्याक आणि प्रौढ शिक्षण संचालनालयातील कर्मचार्‍यांचे समायोजनही करण्यात आले. तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संचालनालयाकडून राबवल्या जाणार्‍या योजना आता स्वतंत्र संचालनालयाच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावरील निरंतन कार्यालयातील शिक्षणाधिकार्‍यांचे नामांतर शिक्षणाधिकारी योजना असे करण्यात आले आहे.

शिक्षण संचालनालय (योजना) या विभागामध्ये संचालक ते सुरक्षारक्षक अशी स्थायी आणि अस्थायी मिळून एकूण 57 पदे असतील. तसेच, प्राथमिक शिक्षण संचालनालयातील शालेय पोषण आहार कक्षातील स्थायी आणि कंत्राटी अशी 22 पदे, तसेच शिक्षणाधिकारी योजना स्तरावरील स्थायी आणि अस्थायी मिळून 350 पदे असतील. त्यामुळे आता प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडील योजनांच्या अंमलबजावणीचे काम कमी होऊन ते शिक्षण संचालनालय (योजना) या कार्यालयाकडून राबवले जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT