पुणे

मे महिन्यात पुण्यातून सर्वाधिक प्रवाशांचे ‘उड्डाण’; तब्बल 6 लाख 69 हजार प्रवाशांनी केला प्रवास

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पुणे विमानतळावरून गेल्या पाच महिन्यांत सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास 'मे' महिन्यात केल्याचे समोर आले आहे. 'मे' महिन्यामध्ये पुणे विमानतळावरून तब्बल 6 लाख 69 हजार 464 प्रवाशांनी प्रवास केला आहे. येत्या काळात पुण्यातून देशभरात प्रवास करणार्‍यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असा विश्वास विमानतळ प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.कोरोनामुळे विमान प्रवाशांची संख्या अक्षरश: घटली होती.

ती आता हळू-हळू वाढत असून, विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या जानेवारी 2022 पासून वाढण्यास सुरुवात झाली. या महिन्यात सव्वा तीन लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. ती संख्या प्रत्येक महिन्यात वाढत राहिली आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि आता मे महिन्यात ही संख्या 6 लाख 69 हजार लाखांच्या घरात पोहोचली आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली.

विमान प्रवाशांचा चढता आलेख

जानेवारी 3 लाख 28 हजार 357
फेब्रुवारी 3 लाख 82 हजार 085
मार्च 5 लाख 59 हजार 396
एप्रिल 5 लाख 03 हजार 606
मे 6 लाख 69 हजार 464 (सर्वाधिक)

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT