पुणे

मुळशीतील वाघवाडी येथे जमिनीला भेगा

अमृता चौगुले

पौड : पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यातील वडगाव-वाघवाडी येथील वाघ पाटीलवस्ती येथे डोंगराच्या पायथ्याला असलेल्या जमिनीला भेगा पडल्या असून, येथील काही घरांची पडझड सुरू झाली आहे. येथील सिमेंट रस्त्यांना तडे गेले आहेत.

मुळशी धरणभागात धरणाचे पाणी व डोंगराच्या मधोमध वडगाव वाघवाडी हे गाव आहे. या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे येथील घरामागील शेतजमिनीला भेगा पडल्या. येथील 18 कुटुंबे यामुळे भयग्रस्त झाली आहेत. यातील 16 नागरिक वाघवाडी जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत इमारतीत राहावयास आले आहेत.

त्यांच्या जेवणाची व्यवस्था तेथेच करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी संदीप जठार, तलाठी संकेत आव्हाड, ग्रामसेवक विजय कुदळे यांनी भेगा पडलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या वेळी सरपंच अर्चना वाघ, सुभाष वाघ, लक्ष्मण वाघ, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर वाघ आदी उपस्थित होते. टाटा कंपनी व शासनाच्या वतीने पक्क्या घरांची व्यवस्था करण्याची मागणी सरपंच अर्चना वाघ यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT