पौड; पुढारी वृत्तसेवा: मुळशी धरण क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर होत असलेल्या संततधार पावसामुळे मुळशी धरण 99 टक्के भरले असून, धरणातून सायंकाळी पुन्हा 15 हजार क्युसेकने विसर्ग मुळा नदीत सोडण्यात आला आहे. रात्री तो वाढवून 20 ते 22 हजार क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापक बसवराज मुन्नोळी यांनी दिली.
मागील चोवीस तासांत मुळशी तालुक्यातील पौड 38 मिलिमीटर, पिरंगुट 11, घोटावडे 50, थेरगाव 23, मुठा 120, माले 146 मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे मुळा नदी दुथडी वाहत आहे. याबाबत नदीच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.